एलआयसीने गृह कर्जाच्या व्याज दरात केली कपात, आता 6.66% व्याज दरावर घेता येईल कर्ज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एलआयसीने गृह कर्जाच्या व्याज दरात केली कपात, आता 6.66% व्याज दरावर घेता येईल कर्ज

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृह कर्जाचे व्याज दर आधीपेक्षा कमी केले आहेत. एलआयसीच्या या विशेष योजनेंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत 50 लाख रुपयांचे कर्ज घेता येणार आहे. परंतु, हे कर्ज केवळ पगारदारांना देण्यात येणार असल्याचे एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या योजनेतील महत्वाच्या गोष्टी

  • 50 लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर हे 6.66% टक्के करण्यात आले आहे.
  • ही योजना 31 ऑगष्टपर्यंत लागू असणार आहे.
  • कर्जाचा पहिला हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी भरण्यात यावा.
  • ही योजना केवळ पगारदारांनाच लागू असणार आहे.
  • नवीन व्याज दर कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असून यासाठी त्यांचा सिबील स्कोअर महत्वाचा असणार आहे.

कोटक महिंद्रा 6.65% व्याज दरावर देत आहे कर्ज
गृह कर्जासाठी सर्वात स्वस्त कर्ज कोटक महिंद्रा बँक देत असून ते 6.65% व्याज दरावर देत आहेत. तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 6.70% टक्के व्याज दरावर कर्ज देत आहे. अशावेळी अनेक बँक 7 टक्क्यांवर कर्ज देत आहे.