Euro Cup 2020: उपांत्यपूर्व फेरीत ‘या’ आठ संघांची धडक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

Euro Cup 2020: उपांत्यपूर्व फेरीत ‘या’ आठ संघांची धडक

यूरो कप २०२० स्पर्धेची रंगत शेवटच्या टप्प्यात आली आहे. साखळी आणि बाद फेरीनंतर आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जियम, इटली, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, युक्रेन आणि इंग्लंड या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

स्वित्झर्लंड विरुद्ध स्पेन

उपांत्यपूर्व फेरीत पहिला सामना स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात रंगणार आहे. यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये स्वित्झर्लंड आणि स्पेन पहिल्यांदाच भिडणार आहे. यापूर्वी स्पेन आणि स्वित्झर्लंड संघ यापूर्वी १९६६, १९९४ आणि २०१० विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने आले होते. १९६६ आणि १९९४ साली स्पेनने स्वित्झर्लंडवर विजय मिळवला होता. तर २०१० साली स्वित्झर्लंडने स्पेनवर विजय मिळवला होता. मोठ्या स्पर्धेत स्वित्झर्लंड चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेतील बाद फेरीत स्वित्झर्लंडची वर्णी साखळी फेरीतील गुण सरासरीमुळे लागली होती. साखळी फेरीत स्वित्झर्लंडची कामगिरी साजेशी नव्हती. वेल्स सोबतचा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर इटलीकडून - ने पराभव सहन करावा लागला होता. तर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात टर्कीचा - ने पराभव केला होता. बाद फेरीत फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड सामना चुरशीचा ठरला होता. दोन्ही संघांनी - गोल केल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला होता. त्यात स्वित्झर्लंड गोल, तर फ्रान्सने गोल मारले होते. साखळी फेरीत स्पेनचा स्वीडन आणि पोलंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर स्लोवाकियाला - ने पराभूत करत स्पेननं बाद फेरीत धडक मारली होती. स्पेननं बाद फेरीत क्रोएशियाला - नं पराभूत केलं होतं.