टी-20 विश्‍वकरंडकाच्या आयोजनाची ओमानची तयारी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टी-20 विश्‍वकरंडकाच्या आयोजनाची ओमानची तयारी

दुबई :- टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्याची तयारी ओमानने दर्शवली आहे. केवळ आता आयसीसी बीसीसीआय यांच्यात काय निर्णय होतो, यावर ही स्पर्धा भारतात होणार का अन्य ठिकाणी हे अवलंबून राहणार आहे.

यजमानपद त्याचे अधिकार कायम राहणार असतील, तर ही स्पर्धा देशाबाहेर घेण्यास हरकत नाही. स्पर्धा अमिरातीतील अबुधाबी, दुबई शारजासह ओमानची राजधानी मस्कतमध्ये होऊ शकते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचे संकेत देण्यात आले आहेत.

आम्ही स्पर्धा देशाबाहेर हलवण्यास तयार असून, आयसीसीला सांगितले आहे. स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. आधीचे सामने मस्कतला होऊ शकतात. जर आयपीएल 10 ऑक्टोबरला संपली तर अमिरातीत टी-20 सामने नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकतीलयामुळे खेळपट्टी तयार करायला तीन आठवड्यांचा वेळ मिळेल, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. त्यातच ओमाननेही

स्पर्धेच्या आयोजनासाठी तयारी दर्शवली आहे. करोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली होती त्यामुळेच टी-20 विश्वकरंडकाबाबतही संभ्रम निर्माण झाला होता.