कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ ‘फ्रेडी’ नंतर आता या चित्रपटातून सुद्धा बाहेर काढलं

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ ‘फ्रेडी’ नंतर आता या चित्रपटातून सुद्धा बाहेर काढलं

बॉलिवूडचालेटेस् हार्टथ्रोबअभिनेता कार्तिक आर्यनचे सध्या वाईट दिवस सुरू झालेत असंच म्हणावं लागेल. सुरवातीला करण जोहरने कार्तिक आर्यनला त्याच्यादोस्ताना मधून बाहेर काढलं, त्यानंतर बॉलिवूडमधल्या किंग खानच्या प्रोडक्शनचा चित्रपटफ्रेडीमधून बाहेर काढलं. त्यापाठोपाठ आता आणखी तिसऱ्या बड्या बजेटच्या चित्रपटातून सुद्धा कार्तिक आर्यनला आऊट करण्यात आलंय. त्यामुळे कार्तिक आर्यनच्या हातून एका मागोमाग एक चित्रपट निसटत चालले आहेत.

फिल्ममेकर आनंद एल राय यांनी अभिनेता कार्तिक आर्यनला एका अनटाइटल् गॅंगस्टर फिल्मसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र आता तो या चित्रपटाचा हिस्सा बनू शकणार नाही. या चित्रपटासाठी कार्तिकची फिल्ममेकर आनंद राय यांच्यासोबत शेवटच्या टप्प्यातील बातचीत सुरू होती. या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कार्तिकने वाचली होती. परंतू चित्रपट साईन करण्यापूर्वीच होत्याचं नव्हतं झालं. अभिनेता कार्तिकला या चित्रपटातून बाहे करण्यामागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. परंतू करण जोहरने कार्तिकला त्याच्यादोस्ताना मधून बाहेर काढलं त्यानंतर बॉलिवूडमधील इतर दिग्दर्शकांनी देखील त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेतला. कार्तिकचा हा तिसरा चित्रपट आहे ज्यातून त्याला बाहेर काढण्यात आलं.

कार्तिक आर्यन आणि फिल्ममेकर आनंद राय हे एकत्र एक फिल्म करणार असल्याचं गेल्या फेब्रूवारीमध्येच जाहीर केलं होतं. कित्येकदा तर कार्तिकला आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं.