अंमली पदार्थ अंधःकार आणि विनाश घेऊन येतात : पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अंमली पदार्थ अंधःकार आणि विनाश घेऊन येतात : पंतप्रधान

नवी दिल्ली  : आंतरराष्ट्रीय  अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.  ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "  आपल्या समाजातून अंमली पदार्थांचा धोका हद्दपार व्हावा यासाठी तळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या सर्वांची   प्रशंसा  करतो.  आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी दिनानिमित्त  अशा प्रकारे आयुष्य वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न महत्वाचा आहे. अंमली पदार्थ आपल्याबरोबर अंधःकार आणि विनाश घेऊन येतात. अंमली पदार्थाबाबत #ShareFactsOnDrugs प्रती आपल्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार करून अंमली पदार्थ मुक्त भारत साकारुया. व्यसन कधीच चांगलं नसतं आणि व्यसन म्हणजे स्टाईल नव्हे याचा विसर पडता कामा नये. अंमली पदार्थांच्या धोक्यावर मात करणाऱ्या विविध पैलूंचा समावेश असलेला  मन की बात’  कार्यक्रमाचा एक भाग प्रदर्शित करीत आहे. "