..तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही, संभाजीराजेंचा सरकारला इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

..तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही, संभाजीराजेंचा सरकारला इशारा

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मराठा क्रांती मूक आंदोलनाची (Maratha kranti andolan Kolhapur) सांगता झाली असून राज्य सरकारने खासदार संभाजीराजे (Sambhajiraje)यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. पण, 'आमच्या इतर मागण्या जर मान्य झाल्या नाहीतर पुणे ते मंत्रालय लाँग मार्च हे शेवटचे अस्त्र असणार आहे' असं म्हणत संभाजीराजे यांनी एकाप्रकारे सरकारला इशारा दिला आहे.

कोल्हापूरमध्ये आज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनानंतर संभाजीराजे यांनी मराठा समन्वयकांचे आभार मानले. यावेळी बोलत असताना संभाजीराजेंनी पुणे ते मंत्रालय लाँग मार्चबद्दल सूचक विधान केलं.

'लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू' असंही राजे म्हणाले.

'अजित पवारांनी बोलावलं होतं मुंबईला'

'अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते' असा खुलासा संभाजीराजेंनी केला.

राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ', असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

'आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासोबत चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे' असं संभाजीराजे म्हणाले.

  • 'म्हणून आज आंदोलन करावे लागले'

'त्यांनी नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया' असंही संभाजीराजे म्हणाले.