‘फ्लाईंग-सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘फ्लाईंग-सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

चंदीगड : फ्लाईंग-सिखनावाने सुप्रसिद्ध असलेले भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. मृत्यू समयी ते 91 वर्षांचे होते. मिल्खा सिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते घरीही परतले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले

गेल्या 20 मे 

रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना झाला होता. यानंतर काही दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग ऑक्सिजन सपोर्टवर होते. सिंह यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, अचानक पुन्हा मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली आणि ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाल्याने त्यांना चंदिगड येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे 5 दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्या 85 वर्षांच्या होत्या. निर्मल मिल्खा सिंग यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत 5 सुवर्णपदक जिंकली आहेत. तसेच 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 400 मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये ते चौथ्या स्थानावर आले होते. मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव मिल्खा हा प्रसिद्ध गोल्फपटू आहे.