राजनाथ सिंह यांनी केले सीमा रस्ते  संघटनेचे कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजनाथ सिंह यांनी केले सीमा रस्ते  संघटनेचे कौतुक

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी
रोजी नवी दिल्ली येथील सीमा सडक भवन येथे सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) स्थापन केलेली दोन
उत्कृष्टता केंद्रे देशाला समर्पित केली. रस्ते सुरक्षामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी तसेच
रस्ते, पूल, हवाई क्षेत्र आणि बोगद्यांच्या बांधकामाला गती देण्यासाठी ही केंद्रे स्थापन केली गेली आहेत.
या प्रसंगी बोलताना राजनाथ सिंह यांनी बीआरओच्या उत्कृष्ट केंद्रे स्थापन करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक
केले आणि लोकांचे अनमोल जीव वाचवण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त
केला.  रस्ते अपघात ही देखील एक मूक महामारी असून यामुळे दरवर्षी दीड लाख लोकांचे मृत्यू होतात
असे ते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी बीआरओ कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर, त्यांचे मनुष्यबळ 
व्यवस्थापन, भर्ती व्यवस्थापन, नावनोंदणी आणि कामांच्या व्यवस्थापनासाठी चार सॉफ्टवेअरचा शुभारंभ
केला.कांचन उगुरसंदी यांच्या लडाख मधील उमलिंगला पास या पहिल्या सोलो वूमन मोटरसायकल
मोहिमेला देखील याप्रसंगी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 
तत्पूर्वी, सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी राजनाथ सिंह यांना
अलिकडच्या वर्षांत बीआरओने हाती घेतलेले उपक्रम आणि कामगिरीबद्दल माहिती दिली.यावेळी चीफ
ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते.
संरक्षण मंत्रालयाने नमूद केले की, सरकारने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण, मोटार वाहन कायदा 2020 आणि
या समस्येवर मात करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर अपघात-प्रवण स्थान ओळखणे असे अनेक उपक्रम
राबवले आहेत आणि या केंद्रांची स्थापना त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने
बीआरओच्या स्थापनेपासून देशातील दुर्गम भागात रस्ते, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा उभारून
देशाच्या प्रगतीमध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. राजनाथ सिंह यांनी बीआरओच्या
विकासासाठी सरकारने केलेल्या विविध उपायांचीही माहिती दिली.
रस्ते सुरक्षा आणि जागरूकता संबंधी उत्कृष्टता केंद्राचे उद्दिष्ट रस्ते अपघातांचे विश्लेषण सामायिक
करून आणि मौल्यवान जीव वाचवण्याच्या पद्धती सुचवून रस्ते   सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण
करणे हे आहे. रस्ते, पूल, हवाई क्षेत्र आणि बोगद्या साठीचे उत्कृष्टता केंद्र मागील अनेक वर्षात
मिळालेल्या ज्ञानाचे संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रित करते.