यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यात भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. आज बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली.