टीम इंडियाला मोठा दिलासा, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ECB ने मान्य केली BCCI ची ही मागणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टीम इंडियाला मोठा दिलासा, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ECB ने मान्य केली BCCI ची ही मागणी

इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) टीम इंडिया (Team India) 4 ऑगस्टपासून यजमान ब्रिटिश संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर 20 दिवसांच्या ब्रेकवर आहेत आणि 14 जुलै रोजी बायो-बबलमध्ये परततील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विनंतीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (Engalnd and Wales Cricket Board) कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी सराव सामन्याचे आयोजन करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी कोणताही प्रथम श्रेणी सामना मिळाल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज होतात्यानंतर बीसीसीआयने (BCCI) ईसीबीला (ECB) काऊंटी संघांविरुद्ध 2 सराव सामन्यांसाठी प्रतिबद्ध केले आहे. दोन्ही सराव सामने डरहॅम येथेच खेळले जातीलआयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत पराभव पत्करावा लागला. जागतिक कसोटी जिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात किवी संघाने 8 विकेटच्या मोठ्या विजयासह विजेतेपद पटकावले. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ कोणताही सराव सामना खेळता अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरला होता, ज्याचा परिणाम स्पष्ट दिसुन आला. पहिला सराव सामना चार दिवसांचा असेल जो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात खेळला जाईल. भारतीय संघ कोणत्या काऊंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळेल, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. यानंतर भारतीय संघ टीम काऊंटी निवड-11 विरुद्ध तीन दिवसीय सामना देखील खेळेल.