पूजाला सलग दुसरे सुवर्णपदक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पूजाला सलग दुसरे सुवर्णपदक

दुबईआशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी चार सुवर्णपदक पटकावण्याची संधी असलेल्या भारतीय महिलांना फक्त एकाच सुवर्णपदकाची कमाई करता आली. पूजा राणीने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र जगज्जेती एमसी मेरी कोम, लालबुतसाही आणि अनुपमा यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या ७५ किलो वजनी गटात पूजाने उझबेकिस्तानच्या मावलुडा मोलोनोव्हाचा - असा पराभव केला. २०१९मध्ये झालेल्या स्पर्धेतही पूजाने या वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. यंदा भारतासाठी सुवर्ण जिंकणारी पूजा एकमेव महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे.

सहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरीकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र ५१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या नाजिम काजैबेने मेरीवर - अशी सरशी साधली. त्यामुळे सहावे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे मेरीचे स्वप्न भंगले. तिचे हे कारकीर्दीतील दुसरे आशियाई रौप्यपदक आहे. मेरीने २००३, २००५,२०१०, २०१२ आणि २०१७मध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

३८ वर्षीय मेरीने आपल्याहून वयाने ११ वर्षांनी लहान असलेल्या नाजिमविरुद्ध अप्रतिम सुरुवात करताना जोमाने हल्ले-प्रतिहल्ले केले. दुसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने बरोबरी झाली. अखेरच्या तीन मिनिटांत मेरीने त्वेषाने लढत दिली. परंतु सामनाधिकाऱ्यांनी विजयाचा गुण नाजिमच्या खात्यावर जमा केला.

कारकीर्दीतील पहिल्याच आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या लालबुतसाहीने कडवा प्रतिकार केला. परंतु कझाकस्तानच्या मिलाना सफ्रानोव्हाने लालबुतसाहीवर - अशी मात केली. नशिबाच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवलेल्या लालबुतसाहीने मात्र संपूर्ण स्पर्धेतील दमदार खेळासह चाहत्यांना तिच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. दिवसाच्या अखेरच्या सामन्यात अनुपमाला पराभव पत्करावा लागला. ८१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या लॅझत कुंजेबायेव्हाने अनुपमाला - असे नमवले. अनुपमाच्या पराभवामुळे भारताच्या नावावर दिवसातील तिसरे रौप्य जमा झाले. सोमवारी पुरुषांच्या वजनी गटाचे अंतिम सामने रंगणार असून भारताच्या तीन जणांनी अंतिम फेरी गाठली आहे. अमित पांघल (५२२ किलो), शिवा थापा (६४ किलो) आणि संजीत (९१ किलो) हे तिघे सुवर्णपदकासाठी दावेदारी पेश करतील.

१७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा

मुंबई  : कुठल्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले होते आणि फेरनिर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते याची आठवणही नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीमकोर्टाने राज्यसरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका नाकारली आहे. मात्र, या राज्यात महाविकास आघाडी सरकार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ओबीसी घटकांचा इतर आरक्षणासोबत राजकीय आरक्षण राहिले पाहिजे या मताशी सहमत आहे, असेही मलिक यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने आयोग स्थापन करुन ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असे स्पष्ट केले आहे. शिवाय देशातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आलेली आहे. जर ही जनगणना झाली तर देशात, राज्यात आणि जिल्हानिहाय किती संख्या आहे याची माहिती मिळू शकते आणि पुढचा निर्णय घेता येऊ शकतो. मात्र, आता सर्व कायदेशीर बाबी तपासून उचित निर्णय राज्य सरकार घेईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.