फेडएक्सतर्फे कोविड- 19 मदत साहित्य वाहून आणणाऱ्या तिसऱ्या चार्टर्ड विमानाच्या रूपाने योगदान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

फेडएक्सतर्फे कोविड- 19 मदत साहित्य वाहून आणणाऱ्या तिसऱ्या चार्टर्ड विमानाच्या रूपाने योगदान

मुंबई : भारताला मदत करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फेडएक्स  एक्सप्रेस या फेडएक्स कॉर्पच्या (एनवायएसई - एफडीएक्स) उपकंपनीने आणि जगातील सर्वात मोठ्या वाहतूक कंपनीने केवळ मदतकार्यासाठी राखून ठेवलेले तिसरे चार्टर्ड विमान कोविड- 19 साठी आवश्यक वस्तू आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) भारतात येत असल्याची घोषणा आज केली आहेतिसरे फेडएक्स बोईंग 777एफ चार्टर्ड विमान 250,000 फेस शील्ड्स, 100,000 गॉगल्स, 80,000 कव्हरऑल्स आणि गाउन्स, 134,000 केएन95 आणि एन95 मास्क इत्यादी सामान घेऊन मेम्फिस, टेनेसीवरून 13 जून 2021 रोजी मुंबईत उतरले. चार्टर्ड विमानातून येत असलेल्या वस्तू डिग्निटी हेल्थ यांनी दान केलेल्या असून टीएमसी नव्याने त्याचे समन्वय केले आहे. या वस्तूंचे टाटा मेमोरियल सेंटरच्या माध्यमातून डायरेक्ट रीलीफद्वारे भारतातील वैद्यकीय सुविधांना वितरण केले जाईल

 

आतापर्यंत फेडएक्सने हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, शेकडो टन वैद्यकीय उपकरणे आणि मदत देशात वितरित केली आहेत. फेडएक्सने यापूर्वी दोन चार्टर्ड बोईंग 777 एफ फ्लाइट अमेरिकेतून भारतात सामान आणण्यासाठी दिली होती. या विमानांनी 9 मे आणि 16 मे रोजी ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर्स डायरेक्ट रीलीफसाठी वैद्यकीय मदतीसह उड्डाण केले होते.   फेडएक्स हा महामारी प्रतिसादावर काम करणाऱ्या, सार्वजनिक- खासगी भागिदारीतून अमेरिकी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित आणि बिझनेस राउंडटेबलचा पाठिंबा लाभलेल्या जागतिक कृती दलाचा सदस्य आहे. या कृती दलातर्फे उद्योगांना एकत्र येऊन आवश्यक त्या स्त्रोतांचा पुरवठा करण्यासाठी, जगभरातील कोविड- 19 ग्रस्त गरजू परिसरांसाठी आवश्यक मदत करण्यासाठी समान व्यासपीठ दिले जाते. फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीओओ राज सुब्रमण्यम हे कृती दलामधे कार्यरत असलेल्या बिझनेस लीडर्सपैकी एक आहेतमहामारीची सुरुवात झाल्यापासूनच फेडएक्सने 90 किलोटन्सपेक्षा जास्त पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आणि 2.3 अब्जांपेक्षा जास्त मास्क जगभरात वितरित केले आहेत. ही महामारी संपेपर्यंत फेडएक्स जीवरक्षक औषधे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करत राहील