31 ऑगस्टपर्यंत ईपीएफ खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा थांबू शकतात पैसे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

31 ऑगस्टपर्यंत ईपीएफ खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा थांबू शकतात पैसे

नवी दिल्ली : EPFO ने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, ईपीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत आपल्या ईपीएफ खात्याला आधारशी लिंक केले नाहीतर खात्यात पैसेदेखील येणार नाहीत. त्यामुळे 31 ऑगस्टपूर्वी आपल्या ईपीएफ खात्याला आधार लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर याचे मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

EPFO ने सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सर्व EPF खातेधारकांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) देखील व्हेरिफाईड करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया की, आपले आधार EPF खात्याशी कसे लिंक करावे.

अशी आहे प्रक्रिया?

  • सर्वात आधी EPFO ​​पोर्टल epfindia.gov.in वर जा.
  • UAN आणि पासवर्ड वापरुन आपल्या खात्याला लॉग इन करा.
  • "Manage” विभागात KYC पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर उघडलेल्या पेजवर आपण आपल्या EPF खात्याशी जोडलेले अनेक कागदपत्रे पाहू शकता.
  • यानंतर आधारचा पर्याय निवडा आणि आधार कार्डवर असलेले तुमचे नाव टाईप करून save वर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल. तुमचे आधार UIDAI च्या डेटासोबत व्हेरिफाईड केले जाईल.
  • तुमचे KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार कार्ड लिंक होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या आधार तपशीलांसमोर “Verify” लिहून येईल.

लिंक केल्यास थांबू शकतात पैसे
जर तुम्ही 1 सप्टेंबरपूर्वी EPFO ​​आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. या व्यतिरिक्त तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. जर EPF खातेधारकाचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO ​​च्या सेवा वापरू शकता येणार नाही.