मर्सिडीझ-बेंझने भारतातील आपला एएमजी पोर्टफोलिओ केला अधिक मजबूत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मर्सिडीझ-बेंझने भारतातील आपला एएमजी पोर्टफोलिओ केला अधिक मजबूत

भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझने आपला शानदार आणि प्रभावी एएमजी पोर्टफोलिओ अधिक जास्त मजबूत करत दोन संपूर्णतः नवीन परफॉर्मन्स सेडान कार आज बाजारपेठेत दाखल केल्या आहेत - मर्सिडीझ-एएमजी ई ५३ ४मॅटिक आणि मर्सिडीझ-एएमजी ई ६३ ४मॅटिक यापैकी एएमजी ई ५३ ४मॅटिक ही भारतात प्रस्तुत करण्यात आलेली एएमजी ५३ सीरिजची दुसरी आणि सेडान बॉडी आकाराची पहिली कार आहे. तर एएमजी ई ६३ एस ४मॅटिक ही मर्सिडीझ-एएमजीच्या 'वन मॅन वन इंजिन' सिद्धांतावर आणि 'ड्रायविंग परफॉर्मन्सेस' या एएमजी ब्रँड वचनावर नव्याने ध्यान केंद्रित करण्याच्या धोरणाचा पुरस्कार करते. ६३ सीरिजमधील मॉडेल्स आजही मर्सिडीझ-एएमजीच्या मुख्य मॉडेल सीरिजचा भाग आहेत आणि जगभरातील कारप्रेमींना या गाड्या प्रचंड आवडतात. एएमजी ई ६३ एस ४मॅटिक मध्ये आता अजून आकर्षक डिझाईन, सुधारित एरोडायनॅमिक्स आहेत आणि ही कार उत्तम आराम मिळवून देते, त्यामुळेच रेस ट्रॅकप्रमाणे कामगिरी बजावण्यासाठी ही सर्वात आदर्श कार आहे आणि त्याबरोबरीनेच रोजच्या वाहतुकीसाठी देखील खूप योग्य ठरते.  

भारतात ३५, ४३, ५३, ६३ आणि जीटी सीरिजसोबत ११ एएमजी उत्पादनांच्या वैविध्यपूर्ण प्रस्तुतीसह आता मर्सिडीझ-एएमजीकडे भारतात परफॉर्मन्स कारचा सर्व आकारांच्या कारचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ उपलब्ध आहे. एएमजी ई ५३ ४मॅटिक आणि एएमजी ई ६३ एस ४मॅटिक दाखल झाल्यामुळे भारतात लक्झरी परफॉर्मन्सेस कार विभागात आपले अग्रणी स्थान अधिक जास्त मजबूत करावे हे मर्सिडीझ-बेंझचे लक्ष्य आहे. मर्सिडीझ-बेंझचे सेल्स आणि मार्केटिंगचे उपाध्यक्ष श्री. संतोष अय्यर यांनी आज नवी दिल्लीमध्ये मर्सिडीझ-बेंझच्या एएमजी परफॉर्मन्स सेंटरमध्ये आयोजित एका फिजिडिजिटल कार्यक्रमात एएमजी ई ५३ ४मॅटिक आणि एएमजी ई ६३ एस ४मॅटिक लॉन्च केल्या.  

श्री. संतोष अय्यर यांनी यावेळी सांगितले, "आज आम्ही भारतीय ग्राहकांसाठी दोन नव्या एएमजी परफॉर्मन्स सेडान कार प्रस्तुत करत आहोत, ज्या 'ड्रायव्हिंग परफॉर्मन्स' या एएमजी ब्रँड वचनाला अनुसरून शानदार कामगिरी बजावण्यासाठी सक्षम आहेत. या दोन्ही सेडान कार फक्त असामान्य, अपवादात्मक कामगिरी आणि वाहन गतिशीलता प्रदान करतात इतकेच नव्हे तर, हॉलमार्क एएमजी विशेषता कायम राखत अधिक जास्त आराम देखील मिळवून देतात. एएमजी ई ५३ ४मॅटिक आणि एएमजी ई ६३ एस ४मॅटिक सोबत आम्ही आमच्या एएमजी पोर्टफोलिओमध्ये पुन्हा नवचेतना आणत आहोत, खास करून त्या परफॉर्मन्सेस प्युरिस्ट्ससाठी ज्यांना आपल्या परफॉर्मन्स कारमध्ये रेसट्रॅक परफॉर्मन्स आणि रोजच्या वाहतुकीची सुविधा यांचे सुयोग्य संतुलन असावे असे वाटत असते. या दोन एएमजी सोबत आता आम्ही भारतात लक्झरी परफॉर्मन्सेस सेडान सेगमेंट मध्ये एक अतुलनीय उत्पादन मिलाप प्रस्तुत करत आहोत."