पॅरालिम्पिक : थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्यपदक रोखलं

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पॅरालिम्पिक : थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्यपदक रोखलं

पॅरालिम्पिक स्पर्धेत रविवार अखेरीस भारताच्या खात्यात तीन पदके आली. देशभरात आनंदाचे वातावरण होते. पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करून भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले होते, पण त्यानंतर थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक रोखले गेले असल्याचे समोर आले. BSFचा ४१ वर्षीय विनोद कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला, त्याने १९.९१मीटर सर्वोत्तम थ्रोसह आशियाई विक्रम रचला. त्याने पोलंडच्या पिओटर कोसेविच (२०.०२ मीटर) आणि क्रोएशियाच्या वेलिमीर सँडर (१९.९८ मीटर) यांच्या नंतर तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकले. पण त्याचे कांस्यपदक थांबवण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुरुषांच्या F52 स्पर्धेत विनोदच्या अपंगत्व वर्गीकरणामुळे त्याचे पदक रोखण्यात आले आहे. आयोजकांनी २२ ऑगस्ट रोजी विनोदचे वर्गीकरण केले होते. वर्गीकरणाला कोणत्या आधारावर आव्हान दिले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्रीडा आयोजकांनी दिलेल्या निवेदनानुसार पदक समारंभ ३० ऑगस्टच्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

 

या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो, ज्यांचे स्नायूंची क्षमता कमी असते, हालचाल मंद असते, हातात आजार असतो आणि पायाच्या लांबीत फरक असतो. असे खेळाडू बसून स्पर्धा करू शकतात. भारताचे संघप्रमुख गुरशरण सिंग यांनी सांगितले, विनोद कुमारचे पदक आतापर्यंत कायम राहील. हा विरोध एका देशाचा असू शकतो किंवा कदाचित एकापेक्षा जास्त देशांचा असू शकतो, तो उघड केला जाऊ शकत नाही म्हणून आम्हाला माहीत नाही. विनोदच्या वर्गीकरणात काही समस्या असू शकते जी पॅरालिम्पिक सुरू होण्यापूर्वी केली गेली होती.”