टेबल टेनिसमध्ये भारताच्या आशा मावळल्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टेबल टेनिसमध्ये भारताच्या आशा मावळल्या

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या महिला एकेरीत झालेल्या स्पर्धेत भारताच्या आशा मावळल्या आहेतही मालिका भारताची स्टार टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राच्या पराभवाने संपली. तिसऱ्या फेरीत मनिका बत्राचा ऑस्ट्रियाच्या खेळाडू सोफिया पोलकानोव्हाने पराभव केला. मानिकाच्या आधी आज पहिला ऑलिम्पिक खेळणारी सुतीर्थ मुखर्जीही दुसर्या फेरीत पराभूत झाल्यानंतर बाहेर गेली आहे.

मनिका बत्राने ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कोनोवाविरुद्ध अपेक्षेनुसार खेळ केला नाही. संपूर्ण सामन्यात तिची लय हरवल्यासारखी वाटली. परिणामी तिला एक गेमही जिंकता आला नाही. पहिल्या चार सामन्यात सोफियाने या सर्वांना चितपट केले आणि तिसर्या फेरीचा सामना सहज - ने जिंकला. सोफिया पोल्कोनोव्हाने मनिका बत्राविरुद्ध -११,-११, -११, -११ असा सामना जिंकला. मनिकाने सोफियाला फक्त पहिल्या फेरीतच थोडीफार टक्कर दिली. सुतिर्था मुखर्जीचा पराभवानंतर भारताला मनिकाकडून मोठ्या आशा होत्या. पण, मानिका त्या अपेक्षेप्रमाणे खेळू शकली नाहीत्यामुळे टेबल टेनिस महिला एकेरीत भारताचा पदकांचा प्रवास संपुष्टात आला आला आहे.

महिला पराभवानंतर भारताचा आशा आता पुरुष एकेरीवर आधारीत आहेत. शरथ कमलने तिसर्या फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या दिवशी झालेल्या दुसर्या फेरीच्या सामन्यात त्याने पोर्तुगालच्या खेळाडूचा पराभव केला. शरथ कमलने सामन्यात - च्या फरकाने सामना जिंकला.