भारतात 24 तासात 1,32,788 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  1,32,788 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  1,32,788  नवे कोरोना रुग्ण आढळले असून  3,207 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  2,31,456  नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे  2,83,07,832 रुग्ण झाले असून एकूण 2,61,79,085  नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 17,93,645 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,35,102 आहे.

आतापर्यंत देशात 21,85,46,667 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 20,19,773 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  35,00,57,330 चाचण्या घेण्यात आल्या.