आयसीसीची फॉलो-ऑन नियमासंदर्भात मोठी घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आयसीसीची फॉलो-ऑन नियमासंदर्भात मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील फॉलो-ऑन नियमाबाबत माहिती दिली आहे. सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, तरी फॉलो-ऑनचा नियम बदलणार नसल्याचे आयसीसीने सांगितले. हवामान आणि पावसाचा विचार करता या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. साऊथम्प्टन येथे १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगणार आहे.

आयसीसीच्या फॉलो-ऑन कलम १४..१नुसार, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या धावसंख्येत २०० धावांची आघाडी मिळाल्यास, प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा फलंदाजीसाठी बोलले जाऊ शकते. ते अशा कमी दिवसांच्या सामन्यासाठी ही आघाडी १५० धावांची असते. दिवसांच्या सामन्यात १०० धावांची आघाडी आणि एका दिवसाच्या सामन्यात ७५ धावांची आघाडी फॉलो-ऑनसाठी वैध आहे.

सामन्याच्या पहिल्या आणि दुसर्या दिवशी कोणताही खेळ झाल्यास, कलम १४. खेळाच्या प्रारंभापासून उर्वरित दिवसांच्या संख्येनुसार (राखीव दिवसासह) लागू होईल. सामना सुरू होणारा दिवस संपूर्ण दिवस म्हणून गणला जाईल, मग तो कोणत्याही वेळेस सामना झाला तरी चालेल. पहिले षटक सुरू होताच खेळाचा दिवस मोजला जाईल .आयसीसीने म्हटले आहे, की जर पहिल्या आणि दुसर्या दिवसाचा खेळ झाला नाही, तर फॉलो-ऑनसाठी आवश्यक असलेली आघाडी १५० धावा अशी होईल.