अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम लग्न बंधनात अडकली आहे. यामीने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केल्याची माहिती दिली आहे. यामीने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत आज जून रोजी लग्न केल्याची माहिती दिली आहे. सध्या यामी आणि आदित्यचा लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी यामीला शुभेच्छा दिल्या आहेत.

यामीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर आदित्यने सफेद रंगाची शेरवानी परिधान केली आहे. लग्नातील फोटो शेअर करत यामीनेकुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहेया आशयाचे कॅप्शन दिले आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यामीने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, ताहिरा कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.