लिबर्टी जनरल इन्शुरन्स ने पोहोच मजबूत करण्यासाठी जोडले महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी संबंध

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लिबर्टी जनरल इन्शुरन्स ने  पोहोच मजबूत करण्यासाठी जोडले महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी संबंध

 मुंबई : भारतातील सर्वसाधारण विमा कंपन्यांमधील आघाडीवर असलेली विमा कंपनी, लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडने महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी धोरणात्मक करार करण्याची घोषणा आज केली.   बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय औरंगाबाद मध्ये असून ते संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी रीजनल रूरल बँक (आरआरबी) आहे आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी सरकारच्या पाठिंब्याने कार्यरत ४३ ग्रामीण बँकांपैकी एक आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्याच्या ४१२ शाखांमधून सुलभ बँकिंग आणि पत सेवा उपलब्ध आहेत.    या भागीदारीमुळे औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, ठाणे आणि नाशिक अशा सात प्रांतांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा नेटवर्कमार्फत लिबर्टी जनरल इन्शुरन्सच्या उत्पादनांचे वितरण सक्षम होईल.    या भागीदारीमुले लिबर्टी जनरल विमा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना आरोग्य विमा, दुचाकी आणि मोटर विमा सह अन्य सामान्य विमा उत्पादनांची व्यापक श्रृंखला उपलब्ध होईल.