कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज पाच लाख रुग्णांची होईल नोंद, नीती आयोगाचा अंदाज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज पाच लाख रुग्णांची होईल नोंद, नीती आयोगाचा अंदाज

नवी दिल्ली, : भारतात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. हे संकट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक भयावह असण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. या संदर्भात सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येऊ शकते आणि या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते. तसेच दोन लाख आयसीयू खाटांचीही आवश्यकता लागू शकते, असा इशारा नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने महत्वपूर्ण शिफाससीही केल्या आहेत.
१०० पैकी २३ बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागेल
आयोगाने म्हटले आहे की, देशात सप्टेंबरमध्ये चार ते पाच लाख दैनंदिन कोरोना बाधितांची नोंद होऊ शकते. प्रत्येकी १०० कोरोना रुग्णांपैकी २३ कोरोना बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. यासाठी आतापासूनच दोन लाख आयसीयू खाटांचे नियोजित करण्याच्या शिफारसी आयोगाने केंद्र सरकारला केल्या आहेत.
अशा केल्या शिफारसी
नीती आयोगाने याआधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर रुग्णालयांत कोरोना बेड्स वेगळे ठेवण्याची शिफारस केली आहे. या संदर्भात कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करणाऱ्यासाठी आपल्याला आधीपासूनच तयार रहावे लागेल. सप्टेंबरपर्यंत दोन लाख आयसीयू खाटा तयार करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. याशिवाय . लाख व्हेंटिलेटर असणाऱ्या आयसीयू खाटा, सात लाख ऑक्सिजन खाटा आणि १० लाख कोविड आयसोलेशन केअर सेंटर असणे आवश्यक आहे.

- दुसऱ्या लाटेबाबतही व्यक्त केला होता अंदाज
आयोगाने यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तेव्हाही आयोगाने प्रत्येकी १०० पैकी सुमारे २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेहून अधिक भयावह असेल, असा अंदाज वारंवर तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.