करोना संपला या भ्रमात राहू नका”; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोना संपला या भ्रमात राहू नका”; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

करोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश करोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी करोना लसीकरणावर जोर दिला आहे. त्यात अनेक देशांनी करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. करोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. “मागच्या २४ तासात ५ लाख नविन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय करोना कमी होण्याची लक्षणं नाहीत”, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक विषाणू आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण करोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ इतकं आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असंही त्यांनी सांगितलं.

करोना पसरण्याची चार प्रमुख कारणं

करोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट व्हायरस वेगाने पसरत आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तील संक्रमित करण्याचा वेग अधिक आहे.

लॉकडाउन आणि नियम शिथिल केल्याने करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

बाजारात, कार्यक्रमात लोकांची गर्दी वाढल्याने करोनाचा वेगाने प्रसार होत आहे.

करोना लसीकरणाचा वेग मंदावल्याने रुग्णसंख्या वाढत आहेत.

करोनामुळे गेल्या काही दिवसांपासून घरातच असणाऱ्या लोकांना मानसिक थकवा जाणवत आहे. त्यामुळे ते सक्तीने बाहेर पडत समाजामध्ये मिसळत आहेत. मात्र संपर्क वाढल्याने करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यात अनेक देशांनी करोनावरील निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं बंधनकारण नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक देशात लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने मृत्यूदर वाढला आहे.

कोव्हॅक्सिन करोनावर प्रभावशाली असल्याचं देखील सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. या लसीचा प्रभाव चांगला दिसत आहे. कोव्हॅक्सिनच्या ३ टप्प्यातील अहवालाचा अभ्यास सुरु आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला जागतिक परवानगी मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.