टीव्हीवर पुन्हा भेटीला येतेय ‘बालिका वधू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टीव्हीवर पुन्हा भेटीला येतेय ‘बालिका वधू

कलर्स टीव्हीवरची लोकप्रिय मालिकाबालिका वधूचा दुसरा सीजन भेटीला येतोय. याची घोषणा कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केलीय. ही नवी मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र या मालिकेची छोटीशी झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आलीय. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आलाय. यातबालिका वधू मधल्या छोट्या आनंदीला दाखवण्यात आलंय.

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये एका लहान मुलीला बालिका वधूच्या रूपात दाखवण्यात आलंय. यात नव्या नवरीच्या वेशभूषेत असलेली ही लहान मुलगी आपल्या ओढणीचे पंख बनवत मिरवताना दाखवण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या पहिल्या प्रोमोमध्ये आनंदीची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवलं होतं. मात्र यंदाच्या प्रोमोमध्ये त्यांनी नव्या सीजनच्या छोटी आनंदीची झलक दाखवली आहे. ‘बालिका वधू मधून भेटीला येणारी ही छोटी आनंदी श्रेया पटेल आहे. या सीजनमध्ये सुद्धा ही छोटी आनंदी बाल विवाह सारख्या प्रथांविरोधात आवाज उठवताना दिसून येणार आहे. सध्या या मालिकेचं शूटिंग राजस्थानमध्ये होतंय. ही मालिका ऑगस्टमध्ये सुरू होईल, असं बोललं जातंय.