श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारात प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय.

झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्यामाझी तुझी रेशीमगाठया मालिकेतून श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेचा पहिला प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलाय. अगदी काही तासातचं या प्रोमोला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. या प्रोमोत हॉटेल मधील एका टेबलावर एक चिमुकली मुलगी प्रश्न विचारताना दिसतेय. ही चिमुकली श्रेयस तळपदेला काही प्रश्न विचारतेय. तर श्रेयसही तिच्या प्रश्नांना उत्तर देत आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत झळकणार आहे. प्रार्थनादेखील बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. माझी तुझी रेशीमगाठया मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. झी मराठीच्या इन्स्ट्राग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर अभिनेता अंकुश चौधरीने देखील कमेंट करत श्रेयसला शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं या चिमुकलीचंही कौतुक केलंय. “वाह वाह श्रेयस. अभिनंदन मित्रा. आणि ती मुलगी किती गोड आहे. कमाल..” अशी कमेंट अंकुश चौधरीने केली आहे.

आभाळमाया’, ‘दामिनी’ ‘अवांतिकामराठी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून श्रेयसने सुरुवातीच्या काळातच आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर हिंदी मालिकांसोबतच तोसावरखेड’, ‘आईशप्पथया मराठी सिनेमांमधून झळकला. 2005 सालामध्ये आलेल्याइक्बालसिनेमातून श्रेयसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.