अंकिता लोखंडे लावणार झी मराठीवरील अनंत चतुर्दशी विशेष कार्यक्रमात हजेरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अंकिता लोखंडे लावणार झी मराठीवरील अनंत चतुर्दशी विशेष कार्यक्रमात हजेरी

गणेशाच्या आगमनाने वातावरणात एक अनोखं चैतन्य पसरतं. अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना मात्र डोळे भरून येतात. सध्या प्रत्येक जण विघ्नहर्त्या गणरायाकडे एकच मागणं मागतोय सर्व दुःखांचा नाश होऊ दे आणि या करोना रुपी संकटातून बाहेर पडून सर्वाचं जीवन सुरळीत सुरु होऊ दे. या अनंत चतुर्दशीला आता दुःखांचं विसर्जन आणि सुखाचं आगमन होणार आहे कारण, या अनंत चतुर्दशीला झी मराठीवर “नव्या नात्यांचा श्री गणेशा” होणार आहे.

नव्या नात्यांच्या बांधू गाठी म्हणत झी मराठी वाहिनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल ५ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. येत्या रविवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीला “नव्या नात्यांचा श्री गणेशा” हा विशेष कार्यक्रम झी मराठी प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहेच आणि या निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यासाठी हा कार्यक्रम हातभार लावणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नव्या नात्यांचा श्रीगणेशा होणार आहे.

या कार्यक्रमातून प्रहसन, गाणी आणि डान्स हे सगळंच प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. प्रेक्षकांचे चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील लाडके विनोदवीर निर्मिती ताईंसोबत या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. त्याचसोबत अंकिता लोखंडे, सोनाली कुलकर्णी, अक्षया देवधर, नेहा खान, अस्मिता देशमुख यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्याचसोबत सलील कुलकर्णी, नंदेश उमप, अभिजीत सावंत यांचे सुमधुर परफॉर्मन्सेस सगळ्यांना मंत्रमुग्ध करतील.

आता लवकरच होणार ''लग्नकल्लोळ''

असे म्हणतात, ''लग्न पहावे करून''. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी असते. याच लग्नसंस्थेवर भाष्य करणारा ''लग्नकल्लोळ'' हा थोडासा वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा टिझर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ''लग्नकल्लोळ'' हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या मुख्य भूमिका असून डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल अण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना लग्नसंस्थेच्या एका वेगळ्या बाजूची ओळख करून देईल हे नक्की.