दयाबेन साकारणाच्या चर्चांवर दिव्यांकाने सोडलं मौन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दयाबेन साकारणाच्या चर्चांवर दिव्यांकाने सोडलं मौन

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून एका कारणामुळे चर्चेत आहे. दिव्यांका लोकप्रिय टीव्ही शोतारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जेठालालची पत्नी दयाबेनच्या भूमिकेत झळकणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता या चर्चांवर दिव्यांकाने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

दिव्यांका त्रिपाठी नुकतीच केप टाउनहून मुंबईला परतली आहे. दिव्यांकाखतरो के खिलाडीया शोच्या शूटिंगासाठी केप टाउनला गेली होती. इथून परतताच दिव्यांकाने तीतारक मेहता का उल्टा चष्माया मालिकेत झळकणार की नाही यावर प्रितिक्रिया दिली. ती हा शो करत नसल्याचं दिव्यांकाने स्पष्ट केलंय. अशा अफवा पसरवून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करू नका असं देखील ती म्हणाली.

 दिव्यांकाने तिच्याखतरो के खिलाडीया शोमधील अनुभवांसोबतच इतरही अनेक प्रश्नांवर प्रतिक्रिया दिल्या. दयाबेनची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर दिव्यांका म्हणाली, “हा एक खूपच मस्त शो आहे. या शोचे अनेक चाहते आहेत. मात्र मला नाही वाटतं मी हा शो करण्यासाठी फारशी उत्सुक आहे. मी एक नवा प्रोजेक्ट आणि नव्या आव्हानांसाठी सध्या उत्सुक असून अशा संधीच्या शोधात आहे.” असं म्हणत दिव्यांकाने तीतारक मेहता…’मध्ये दयाबेनची भूमिका साकारणार नसल्याचं स्पष्ट केलंय.