नयनतारा स्टारर ‘नेत्रिकन्न’चं पोस्टर रिलीज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नयनतारा स्टारर ‘नेत्रिकन्न’चं पोस्टर रिलीज

साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिलीजच्या प्रतिक्षेत असलेला अभिनेत्री नयनतारा हिचा आगामीनेत्रिकन्नहा चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज झाला असून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. मिलिंद राऊ दिग्दर्शितनेत्रिकन्नया चित्रपटाचा पोस्टर शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलीय. चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. नयनतारा मुख्य भूमिकेत असलेली ही तमिळ थ्रीलर फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

डिस्ने + हॉटस्टारच्या ट्विटर अकाउंटवर नयनतारा स्टाररनेत्रिकन्नया चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. हे पोस्टर शेअर करण्याबरोबरच हा चित्रपट लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर डिस्ने + हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. या चित्रपटाचा प्रोड्यूसर विग्नेश शिवन याने हे ट्विट शेअर करत चित्रपट रिलीजच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘आनंद आणि अभिमान वाटतोय…!!! रिलीजची तारीख लवकरचअसं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

 

नयनतारा ही तमिळ अभिनेत्री असली, तरी तिचे टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिच्यानेत्रिकन्नचित्रपटाची घोषणा केल्यापासूनच हा चित्रपट कधी येणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री नयनतारा हिचानेत्रिकन्नहा चित्रपटरायन पिक्चर्सया बॅनरखाली प्रोड्यूसर विग्नेश शिवनची पहिली निर्मिती असणार आहे. हा चित्रपटब्लाइंडनावाच्या एका कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं सांगण्यात येतंय. हा एक तमिळ थ्रीलर चित्रपट असून यात एक अंध महिला हिट-ॅण्ड-रन प्रकरणात साक्ष देते आणि त्यामूळे हत्यारे आणि तिच्यातला रंगणारा रंजक सामना या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात पोलिस अकादमीमधल्या एका कॅडेटच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात एका कार अपघातात ती आपले डोळे गमावते.