श्वेता तिवारीच्या आरोपांवर अभिनव म्हणाला…

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

श्वेता तिवारीच्या आरोपांवर अभिनव म्हणाला…

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा भावी पती अभिनव कोहली यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोघांमधील आरोप प्रत्यारोपांतच्या फैरी सुरूच आहेत. श्वेता तिवारी मुलाला एकटं सोडून दक्षिण अफ्रेकेला गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. अभिनवने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत माझा मुलगा कुठे आहे? असा सवाल करत चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर श्वेतानेही अभिनववर काही आरोप केले.

अभिनवने केलेल्या आरोपावंर श्वेताने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत श्वेता म्हणाली, “मी केपटाऊनला रेयांश, त्याची आया आणि आईला सोबत आणलं असतं, पण अभिनवने यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा सहमती दिली नाही. मी रेयांनशच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.” असे आरोप श्वेताने केले.
श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत श्वेताने केलेला दावा खोटा असल्याचं म्हंटलं आहे.

अभिनवने श्वेतावर पुन्हा अनेक आरोप केले आहेत. तो म्हणाला, ” तू मुलाखतीत म्हणालीस की मी मुलांच्या संगोपनासाठी एक रुपया खर्च केला नाही. तुला जराही लाज वाटत नाही. जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो केलात्य़ानंतरही शो केलेजवळपास ४० टक्के मी माझ्या अकाऊंमधऊन तुझ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले आहेत. पैसे पचवतेसही आणि म्हणते मी पैसे खर्च करत नाही. तू एकटीच पैसे खर्च करतेयस.” असं म्हणत अभिनवने श्वेताने केलेले आरोप फेटाळले आहेत.