थोरात कारखाना स्वीकृत संचालकपदी रामदास वाघ,संभाजी वाकचौरे यांची निवड

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

थोरात कारखाना स्वीकृत संचालकपदी रामदास वाघ,संभाजी वाकचौरे यांची निवड

अहमदनगर : देशातील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या संगमनेर च्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रामदास पा.वाघ अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील संभाजी वाकचौरे यांची निवड झाली आहे

कारखान्याच्या विश्रामगृहावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात .डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत या नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,उपा ध्यक्ष संतोष हासे,इंद्रजित थोरात, चंद्रकांत कडलग,इंदजित खेमनर,गणपतराव सांगळे,रमेश गुंजाळ,रोहिदास पवार, मिना नाथ वर्पे,अभिजीत ढोले,संपतराव गोडगे,भाऊसाहेब शिंदे,डॉ.तुषार दिघे,माणिकराव यादव,भास्करराव आरोटे,दादा साहेब कुटे,विनोद हासे,अनिल काळे,मिरा वर्पे,मंदा वाघ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,एस.डी.भवर,किरण कानवडे,केशव दिघे,राजेंद्र कढणे आदि उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले कि,कारखाना हा तालुक्याचे ह्दय आहे.अत्यंत अडचणीतून कारखान्याने केलेली वाटचाल,वेळोवेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे.संगमनेर हे सहकाराचे मॉडेल असून प्रत्येक कार्यकर्ता,सभासद,कर्मचारी या संस्था आपले कुटुंब म्हणून सांभाळत आहे.या सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागाला मोठे बळ मिळाले आहे.वाघ वाकचौरे यांनी अनेक वर्ष सहकारात चांगले काम केले असून ते कारखान्याच्या वाटचालीत आपले योगदान देतील असे ही ते म्हणाले..डॉ.तांबे म्हणाले कि,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व संस्थांचे पदाधिकारी एक दिलाने काम करत असून संगमनेर तालुक्यातील संस्था राज्याला दिशादर्शक ठरल्या आहे.नवनिर्वाचीत संचालक रामदास वाघ,संभाजी वाकचौरे यांची यावेळी भाषणे झाली.उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.