सीईटीच्या अर्जासाठी २५ जुलैपर्यंत मुदत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सीईटीच्या अर्जासाठी २५ जुलैपर्यंत मुदत

पुणे : सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे  (सीईटी सेल) फाईन आर्ट्स आणि डिझाइन पदवी प्रवेशांसाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २५ जुलैपर्यंत सीईटीसाठी अर्ज करता येईल. या सीईटीमध्ये प्रात्यक्षिक परीक्षांवर भर असल्याने विद्यार्थ्यांनी निवडलेल्या केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल.

राज्यातील शासकीय कला महाविद्यालये, तसेच खासगी महाविद्यालयांत फाईन आर्ट्स, डिझाईन अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. बारावीमध्ये किमान ४५ टक्के  गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेला अर्ज करता येईल. तीन प्रात्यक्षिकांचे विषय आणि एक लेखी विषय असे या परीक्षेचे स्वरूप आहे. अर्ज करण्यासाठी २५ जुलै अंतिम मुदत आहे, तर ३१ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येईल.

याच केंद्रांवर प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाईल. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात ही परीक्षा घेतली जाईल, असे सीईटी सेलने स्पष्ट के ले आहे. अधिक माहिती  cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.