पुणेकरांवर निर्बंधांची पुन्हा टांगती तलवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुणेकरांवर निर्बंधांची पुन्हा टांगती तलवार

पुणे :राज्य शासनाने लॉकडाऊनबाबतचा नवा आदेश जारी केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. पुण्यात सकाळी झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आताचेच निर्बंध कायम असतील असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, पालिका प्रशासनाकडूनही नियमात कोणताही बदल नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी राज्य शासनाचे आदेश आल्याने त्यानुसार नियमात बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आदेशाबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार दुकानांच्या आणि हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्यापारीवर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर सुरुवातीला दुपारी चारपर्यंतची मुभा दिली होती. या काळात दुकाने उघडण्यास आणि हॉटेलमध्ये बसून जेवण्यास परवानगी दिली होती. पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा दुकानाच्या वेळा संध्याकाळी सातपर्यंत वाढविल्या होत्या. तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार रात्री दहापर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे नागरिक आणि व्यापारीवर्ग काही काळ सुखावला होता. परंतु, राज्य शासनाने एक ते चार लेव्हलची पुनर्रचना केली आहे. त्यामुळे हा संभ्रम वाढला आहे