नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं – राजू पाटील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं – राजू पाटील

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक दि बा पाटील यांच्या नावावर ठाम आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. दरम्यान नवी मुंबईत दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात मनसे आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असातना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो आहोत,” असं राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान राज ठाकरेंनी शिवरायांचं नाव असावं अशी भूमिका घेण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर ते विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल तर त्याला तांत्रिक बाब म्हणून आपोआप शिवरायांचं नाव येणार आहे, ती काही आमची मागणी नाही. नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं”. आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.