ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही!

केप टाऊन येथे २०१८ साली झालेले बॉल टॅम्परिंग प्रकरण खूप गाजले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या
या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून बँक्रॉफ्टने सँडपेपरचा तुकडा वापरत चेंडूशी छेडछाड केली होती.
त्यामुळे त्याच्यासह कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्यात
आली होती. तसेच या तिघांव्यतिरिक्त कोणालाही बॉल टॅम्परिंगबाबत माहिती नव्हती असे म्हटले गेले.
मात्र, बँक्रॉफ्टने काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही चेंडूशी छेडछाड
केली जात आहे याची कल्पना होती, असे बँक्रॉफ्ट म्हणाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी
एकत्रित स्पष्टीकरण दिले. परंतु, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही, असा
हल्लाबोल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केला आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दिले स्पष्टीकरण
बँक्रॉफ्टप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचे त्यावेळचे गोलंदाजी प्रशिक्षक डेविड सेकर यांनी बॉल टॅम्परिंग प्रकरणाला
केवळ तीन खेळाडू जबाबदार नव्हते, असे सूचक विधान केले होते. या दोघांच्या खुलाशानंतर क्लार्कनेही
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चेंडूशी छेडछाड केली जात असल्याची माहिती असणार असे म्हटले होते.
त्यानंतर त्या कसोटीत खेळलेल्या मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड आणि नेथन लायन या
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी एकत्रित स्पष्टीकरण दिले. हे चारही गोलंदाज माझे मित्र आहेत. परंतु, त्यांचे
स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही, असे क्लार्क आता म्हणाला.