‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’! केजरीवाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’! केजरीवाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

दिल्ली : करोना महामारीच्या चौथ्या लाटेवर मात करून पूर्वपदावर येत असलेल्या दिल्लीत आता लसीकरणावर जोर दिला जाणार आहे. दिल्ली सरकारने त्यादृष्टीने पावलं उचलली असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तशी घोषणाही केली आहे. लोकांमधील गोंधळ दूर करून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केजरीवाल सरकारनेजहां व्होट, वहा वैक्सिनेशनअर्थात ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, तिथेच नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अभियानाची घोषणा केली.

करोनाच्या चौथ्या लाटेनं दिल्लीत भयावर परिस्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांच्या टंचाईमुळे दिल्लीत प्रचंड मनुष्यहानी झाली. जवळपास महिनाभर दिल्ली सरकार आणि प्रशासनाची चौथ्या लाटेनं झोप उडवली होती. ऑक्सिजन पुरवठा आणि संसर्गाचा वेग कमी झाल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, दिल्ली सरकारने आता नागरिकांची फरफट थांबवून जास्तीत जास्त लसीकरण लोकांचं लसीकरण करण्यासाठी नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली. “दिल्ली सरकार आजपासूनजहा व्होट, वही वैक्सिनेशन’ (ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केलं जाणार) कार्यक्रम सुरू करत आहे. या कार्यक्रमातंर्गत ज्या मतदार केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केलं जाईल, त्यामुळे लस घेण्यासाठी त्या मतदान केंद्रावरच जावं, अशी माहिती लोकांना दिली जाणार आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याला लवकरच सुरूवात केली जाईल. पुढील चार आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाईल,” अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.