योग्य त्या उपाययोजना केल्यास तिसरी लाट थोपवता येईल’,

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

योग्य त्या उपाययोजना केल्यास तिसरी लाट थोपवता येईल’,

नवी दिल्ली: देशात करोना साथीची तिसरी लाट अटळ असल्याच्या विधानावर माघार घेत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी, शुक्रवारीयोग्य त्या उपाययोजना केल्यास तिसरी लाट थोपवता येईल’, असे सांगितले.

देशात करोनाची तिसरी लाट अटळ आहे, असे विधान राघवन यांनी बुधवारी केले होते. त्यावर स्पष्टीकरण करताना विजय राघवन म्हणाले, ‘‘जर पुरेशा उपाययोजना केल्या तर देशात तिसरी लाट सर्वत्र येणार नाही. कुठल्याही साथीमध्ये चढउतार असतात. जर सहजपणे रोगाचा संसर्ग होऊ शकेल, अशा लोकांची संख्या जास्त असेल तरच लाटेची परिस्थिती निर्माण होते.’’ साथीच्या लाटा किंवा त्यांची संख्या, रुग्णांची संख्या याबाबत बोलण्यापेक्षा आपण आता संसर्गाची ठिकाणे, वेळ आणि तीव्रता याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. जर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर कुठेच करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असे राघवन यांनी स्पष्ट केले.विषाणूचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो, हे सर्वांना ज्ञात आहे. जेव्हा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला नाही तर संसर्गाला बळी पडू, असेही ते म्हणाले.

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण गरजेचे आहे. कारण रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते. लोक जर आत्मसंतुष्ट राहिले आणि त्यांनी नियम पाळले नाहीत तर पुन्हा संसर्गाची शक्यता वाढते. जर लोकांनी लाट ओसरलीं, असे समजून उपायांकडे दुर्लक्ष केले तर धोका आहे, पण जर आपण विषाणूला संधीच दिली नाही तर तो नष्ट होईल. विषाणूच्या लाटांचे चढउतार आपण नियंत्रित करू शकतो. त्यासाठी मुखपट्टी, सामाजिक अंतर, साबणाने हात धुणे आणि लसीकरण यांसारखे मार्ग आहेत.

करोनाची तिसरी लाट अटळ असून या विषाणूचे अनेक प्रकार आहेत. तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येणार नाही, पण लोकांमध्ये आता प्रतिकारशक्तीही निर्माण होत आहे. विषाणू लोकांना संसर्ग करण्यासाठी नवे मार्ग शोधत आहे, असे राघवन यांनी बुधवारी म्हटले होते.