एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’नं जाता येणार; ठाकरे सरकारनं घेतला निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’नं जाता येणार; ठाकरे सरकारनं घेतला निर्णय

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता पायी जावं लागणार नाही. लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात आणि पुण्यातील राजगड किल्ल्यावर फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांनी शुक्रवारी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता काही मिनिटांमध्ये भाविकांना येथे जाता येणार आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. रोप वे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल)मध्ये हा करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळातर्फे कृषी-पर्यटनाला चालना देण्यासाठी हा करार करण्यात आला. हा प्रकल्पबांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल) या तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे.