लोकसभेतील 403 खासदारांचे लसीकरण पूर्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लोकसभेतील 403 खासदारांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली : लोकसभेच्या 540 पैकी 403 खासदारांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर उर्वरित 137 खासदारांपैकी अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आगामी जुलै महिन्यात होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा मार्ग मोकळा झाला.  लोकसभेच्या 30 खासदारांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली की नाही याबाबत काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे या संसदेचे कर्मचारी या खासदारांना सातत्याने संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनामुळे संसदेच्या कामकाजावरही परिणाम झाला, त्यामुळे गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन लवकर संपवण्यात आले.संसदेत अध्या 40 हून अधिक बिल आणि 5 अध्यादेश प्रलंबित आहेत. देशात आतापर्यंत 50 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह तीन खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना चाचणी आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून अधिवेशन घेतले जाणार आहे.