जगात भारी बापलेकाची जोडी! सचिनने मुलासोबतचा समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो केला शेअर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जगात भारी बापलेकाची जोडी! सचिनने मुलासोबतचा समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो केला शेअर

आयपीएल २०२१ मध्ये खेळाडूंची मजा करतानाचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण यावेळी भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. तो आपला मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकरसोबत समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. मंगळवारी (२१ सप्टेंबर) सचिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे दोन फोटो शेअर केले, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक खेळाडू देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.

हे फोटो शेअर करताना सचिनने लिहिले, 'माझ्या सनशाईन सोबत.' या चित्रात सचिन आणि अर्जुन दोघेही खूप आनंदात दिसत आहेत. सचिनने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी टोपी घातली आहे, तर अर्जुन लाल रंगाचा स्लीव्हलेस टी-शर्ट परिधान केला आहे. दोघेही खूप आनंदात दिसत आहे.

वडील आणि मुलाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत १६ लाखांहून अधिक लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी, सर्वात मजेदार टिप्पणी सचिनचा सर्वात चांगला मित्र आणि माजी खेळाडू विनोद कांबळीने केली आहे. कांबळीने लिहिले की, 'बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभान अल्लाह.' याशिवाय सचिनची मुलगी आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने त्यावर एक प्रेम इमोजी पाठवले आहेत.

यावेळी सचिन आणि अर्जुन मुंबई इंडियन्ससोबत युएईमध्ये आहेत. अबु धाबीमध्ये झालेल्या मुंबईच्या पहिल्या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला २० लाखांच्या मूळ किंमतीवर त्यांच्या संघात समाविष्ट केले होते, परंतु त्याला अद्याप खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही.

अर्जुन हा वडील सचिन तेंडुलकरसारखा उजवा नाहीतर डावखुरा फलंदाज आहे. तसेच तो एक चांगला क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज आहे. त्याची गणना एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू म्हणून होत आहे. आयपीएलपूर्वी त्याने यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली होती.