इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री,

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री,

लंडन, 3 जुलै : इंग्लंडमध्य्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पेशंट्सची संख्या अजूनही वाढत आहे. क्रिकेट विश्वाला देखील याचा फटका बसला आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) मालिकेच्या संबंधित काही जणांना यापूर्वी कोरोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यापाठोपाठ आता इंग्लंडमधील टी 20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेतही कोरोनाची एन्ट्री झाली आहे.

या स्पर्धेत बर्मिंगहॅम बिअर्स (Birmingham Bears) टीमकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत ब्रेथवेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर 9 मॅचमध्ये 13.33 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेथवेटनं तीन दिवसांपूर्वीच यॉर्कशर विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्याने 2 ओव्हर्समध्ये फक्त 7 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. ब्रेथवेटच्या घातक स्पेलमुळे यॉर्कशरची टीम 81 रनवरच ऑल आऊट झाली. त्यानंतर बर्मिंगहॅम बिअर्सनं हे आव्हान 9 व्या ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पूर्ण केले होते.