आपला मोठा कामगारवर्ग कायम ठेवण्यासाठी ‘एल अँड टी’चे विशेष प्रयत्न

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आपला मोठा कामगारवर्ग कायम ठेवण्यासाठी ‘एल अँड टी’चे विशेष प्रयत्न

मुंबई : कोविड साथीच्या दुसर्‍या लाटेचा प्रतिकूल परिणाम संपूर्ण देशावर झालेला असताना आणि तिसर्‍या लाटेचा
धोका समोर उभा असताना, ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या प्रकल्पांची कामे व कारखाने सुरळीत सुरू आहेत. याचे
कारण, या कंपनीच्या कर्मचारी वर्गाने कामावर उपस्थित राहण्याचा पर्याय निवडला आहे आणि आपले कर्मचारी
सुरक्षित, निरोगी, व्यग्र आणि प्रेरीत राहावेत, यासाठी कंपनीनेदेखील अनेक उपक्रम राबविले आहेत.
 विविध प्रकारचे व्यवसाय आणि त्यांच्या कामकाजाची मोठी व्याप्ती, त्याचप्रमाणे त्यांतील उच्च व सामर्थ्यपूर्ण
अशी जटील अभियांत्रिकी, बांधकाम, तंत्रज्ञान, संरक्षण प्रकल्प असा विस्तृत कारभार असलेल्या ‘एल अँड टी’
कंपनीला काही विशिष्ट प्रकल्पांवर कुशल व अकुशल कामगार कंत्राटावर नेमणे आवश्यक असते. पीक काढणीचा
हंगाम किंवा सध्याची कोविडची साथ अशा काही विशिष्ट कालावधीत होणारी कामे, तसेच विविध प्रकल्पांची
मागणी, यांनुरुप मनुष्यबळाचे हे प्रमाण बदलत असते. मार्च 2021 पर्यंत कंपनीच्या छोट्या-मोठ्या प्रकल्पांसाठी
आमच्याकडे सुमारे 2,45,000 कंत्राटी कामगार होते. कोविडच्या पहिल्या लाटेत ‘एल अँड टी’सह सर्व बांधकाम व
पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांमधील कामगार मोठ्या संख्येने आपापल्या गावी निघून गेले. आताच्या वेळी
मात्र कंपनीने आपल्या प्रकल्पांच्या साईट्सवरील सुमारे 70 टक्के कामगार रोखून ठेवण्यात यश मिळवले आहे. 
 “काही कामगार यावेळीदेखील आपल्या गावी गेले आहेत; परंतु ‘लार्सन अँड टुब्रो’बद्दल बोलायचे झाल्यास, यातील
अनेकांना आम्ही परत आणले आहे. ‘एल अँड टी’मध्ये आपण सुरक्षित आहात, असे कामगारांना सांगण्यासाठी
आम्ही आमच्या सर्व साईट्सवर, विशेषतः कामगार वसाहतींमध्ये आणि कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहीम
राबविली आहे,” असे ‘एल अँड टी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रम्हण्यन
यांनी सांगितले.  कार्यक्षम वैद्यकीय देखभाल, स्वच्छताविषयक सुविधांची तरतूद, सौम्य स्वरुपाची लागण
झालेल्यांसाठी विलगीकरण केंद्रांची उभारणी, रुग्णालयांशी केलेले करार, डॉक्टरांशी संपर्क, नर्सिंग व उपचारांची
उपलब्धता, आरोग्यदायी व पोषक अन्नपुरवठा यांबरोबरच, #L&TCares #SafewithL&T, #YourChoice
यांसारख्या संपर्क मोहिमा सतत राबवून कर्मचाऱ्यांना माहिती व प्रेरणा देणे, या उपक्रमांमुळे कंपनीला कोविडच्या
दुसऱ्या लाटेत कामगारांना टिकवून ठेवणे शक्य झाले. 
 “आमच्या सर्व कामगार वस्तींमध्ये, चोवीस तास डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे
कामगारांना मोठाच दिलासा मिळतो,” असे ‘एल अँड टी’चे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी डॉ. सी. जयकुमार
यांनी सांगितले. 
कंपनीच्या आवारात ‘कोविड प्रोटोकॉल’ची कठोर अंमलबजावणी होत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे, कोविडच्या
रुग्णांची संख्या सर्वत्र प्रचंड वाढत असतानादेखील ‘एल अँड टी’च्या साइट्सवर आणि कारखान्यांमध्ये संसर्ग
होणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. कंपनीने काही ठिकाणी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ वितरीत करणेदेखील सुरू केले
आहे.

 कोविड साथीचा त्रास आणि त्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याची दक्षता घेण्याबद्दल कामगारांना कंपनी
शिक्षित करीत आहेच; त्याशिवाय, कंपनीने स्थानिक रुग्णालये व आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून आणि स्थानिक
प्रशासनाच्या संबंधाच्या जोरावर आपल्या कामगारांसाठी लसीकरण आयोजित केले आहे. ‘एल अँड टी’च्या अनेक
साईट्सवरील बहुसंख्य कामगारांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. 
 डॉ. जयकुमार पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या बांधकाम कौशल्य प्रशिक्षण संस्था, आमची काही अपार्टमेंट्स, इतर
प्रशिक्षण केंद्रे यांचे रुपांतर कोविड केंद्रांमध्ये केले आहे. तसेच ‘व्हेन्टिलेटर’ने सुसज्ज खाटा उपलब्ध करून
देण्याबाबत काही हॉटेल्सशी हातमिळवणी केली आहे.”