मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी चीनची खेळाडू झीयू हौ हिची डोपिंग टेस्ट होणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर ही चर्चा रंगली आहे. जर झीयू हौ डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या क्रमांकावर विजेती राहिलेल्या मिराबाई चानूचं मेडल अपडेट केलं जाईल आणि सुवर्णपदक दिलं जाईल. असं झालं तर मिराबाई चानूसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल. यासोबतच वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मिराबाई चानू पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे.

मिराबाई चानूची ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई

मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन ॅण्ड जर्क प्रकारात उचलले.

एका जिद्दीची कहाणी!

वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक

चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.

 


टी-२० सामन्यात भारताची श्रीलंकेवर ३८ धावांंनी मात
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने श्रीलंकेला मायदेशातच पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता आगामी टी-२० सामन्यांमध्येही भारताने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर ३८ धावांनी मात केली. यामुळे तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने - अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानावर रविवारी टी-२० सामन्यांतील पहिला सामना खेळला गेला. यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारने निर्णायक खेळी केली. सूर्यकुमारने दमदार अर्धशतक ठोकले. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संघ १८. षटकांत केवळ १२६ धावा करत तंबूत परतला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी शॉ शुन्यावर बाद झाला. पृथ्वी शॉनंतर मैदानात उतरलेल्या संजू सॅमसनने शिखर धवनसोबत भारताचा डाव सावरला. मात्र ५१ धावांची भागीदारी करत संजू देखील २७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सूर्यकुमार आणि शिखर दोघांनी मिळून ५२ धावांची भागिदारी केली. मात्र १४ व्या षटकात धवन ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर १५ व्या षटकांत सूर्यकुमारही ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या १०, इशान किशन २० आणि कृणाल पांड्याने तीन धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून हसरंगा आणि चमीरा यांनी प्रत्येकी दोन तर करुणारत्नेने एक बळी घेतले.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवातही खराबच झाली. श्रीलंकेकडून असालांकाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. अविष्का फर्नांडो २६, दसून शनाका १६ आणि मीनोद भानुकाने १० धावा केल्या. श्रीलंकेचे अन्य खेळाडू धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार, तर दीपक चहर दोन, कृणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक-एक बळी घेतले.  यानंतर पुढील दोन सामने अनुक्रमे मंगळवारी आणि गुरुवारी खेळवले जाणार आहेत.