आघाडीत नाराजी नाही,आमचं सरकार पाच वर्षे टिकेल : खळबळजनक क्लिपवर पटोलेंचा खुलासा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आघाडीत नाराजी नाही,आमचं सरकार पाच वर्षे टिकेल : खळबळजनक क्लिपवर पटोलेंचा खुलासा

नागपूर : स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या राज्यभर दौ-यांचा सपाटा लावला आहे.लोणावळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणाची एक क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून असून,आपण स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आरोप त्यांनी केला आहे.त्यानंतर त्यांनी या प्रकरणी खुलासा करीत माझ्या वक्तवव्याचा चुकीचा अर्थ काढला असल्याचे सांगितले आहे.  
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते.त्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुर सुरू झाली होती.तर आपण नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला असतानाच,लोणावळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले यांनी केलेल्या भाषणाची एक क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून असून,आपण स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आरोप त्यांनी केला आहे.त्यांच्या वक्तव्याच्या क्लिप नंतर राज्याच्या राजकारणात एकच अनेक चर्चांना उधाण आले आहे.त्यांनतर पटोले यांनी केलेल्या खुलाश्यात आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे.कहाण्या रचून महाविकास आघाडीत फूट पडण्याचा डाव सुरू आहे.पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही,अशा शब्दात पटोले यांनी विरोधकांवर पलटवार केला.
आमचा भाजपला विरोध असून,आमचे सत्तेतील मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी आमची दुश्मनी नाही.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे टिकेल असे सांगून,आमच्या तिन्ही पक्षात कुठलेही मतभेद नाहीत असेही पटोले यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा कहाण्या रचल्या जात आहेत.पटोले यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला जर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरं भरले आहे, असे फडणवीस म्हणत असतील तर ज्यावेळी माझे फोन टॅप केले केले ते काय होते ? त्यावेळी तुम्हालाही माझी भीती वाटली होती का ?, असा सवाल पटोले यांनी केला.पटोले यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तुम्ही त्यांना भेटणार का असे पटोले यांना विचारले असता, पटोले म्हणाले की,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला भेटायला बोलावले तर मी त्यांना भेटायला जाईल.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देणार नाही असे पटोले यांनी स्पष्ट केले.