तिसरी लाट थोपवण्यासाठी सज्ज रहिले पाहिजे- पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिसरी लाट थोपवण्यासाठी सज्ज रहिले पाहिजे- पंतप्रधान

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि केरळमधील रूग्णांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी

कोरोनाचा डेल्टा वेरिएंट सर्वाधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. जगातील 111 देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केलाय. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला गेल्या आठवड्यात याच 6 राज्यातून 80 टक्के कोरोनाबाधितांचे रूग्ण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र, केरळ यांच्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपल्याला पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅक आणि टीका याच्या 'चार टी' रणनीतिवर पुढे जावे लागणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढतायत तिथे पावले उचलणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नाही. दीर्घकाळात केसेस वाढत राहिल्या तर म्युटेशन वाढते. मायक्रो कंटनेमेंट झोनच्या कठोर अंमलबाजणीनं चांगला अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक राज्य आरटीपीसीआर टेस्टिंगच्या क्षमता वाढण्य़ासाठी प्रयत्न करतायत, हे चांगल आहे. केंद्र सरकारने 23 हजार कोटींचे एक हेल्थ पॅकेज जाहीर केले आहे ग्रामीण भागावर आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. मिशन मोडमध्ये अधिकारी नेमून पंधरा ते 20 दिवसात पीएसए ऑक्सिजन प्लाँटचं काम पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. युरोपातील देशांमध्ये गेल्या तीन आठवड्यात रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. तशीच स्थिती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.