मुसळधार पावसाने सर्वत्र साचले पाणी; रेल्वे सेवाही विस्कळीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुसळधार पावसाने सर्वत्र साचले पाणी; रेल्वे सेवाही विस्कळीत

मुंबई, जून, (हिं.) : मुंबईत रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. रेल्वे रुळांमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे

मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. तर नवी ठाणे, रायगडलाही मुसळधार पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाकडून कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहेराज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. मुंबईत १० जून ते १२ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.तसेच राज्य सरकारनेही जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.