कसारा घाटात दरड कोसळल्याने नाशिककडे जाणारा मार्ग बंद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कसारा घाटात दरड कोसळल्याने नाशिककडे जाणारा मार्ग बंद

मुंबई :  मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. यामुळे दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक सुरू आहे.
सध्या ट्रॅकवर पडलेली माती बाजूला सारण्याचे काम सुरू आहे. यासाठी दरड हटवण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर केले जात असून, त्यासाठी मातीचे ढिगारे हटवणाऱ्या ट्रेन्स, विविध मशिन्स आणि मजूर सध्या काम करत आहेत.

रद्द करण्यात आलेल्या आलेल्या गाड्या :

सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल

सीएसएमटी-लातूर स्पेशल

सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल

सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल

सीएसएमटी-गडग स्पेशल

सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल

सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल