नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५९ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५९ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक :- जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील लाख ५९ हजार ३४८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १५ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १०७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत हजार ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक हजार ६८४, बागलाण ७२०, चांदवड ६९६, देवळा ६५६, दिंडोरी ७७६, इगतपुरी १७३, कळवण ५८१, मालेगाव ४७९, नांदगाव ४७५, निफाड हजार २९८, पेठ ७५, सिन्नर हजार १८१, सुरगाणा २४३, त्र्यंबकेश्वर १२८, येवला २४३ असे एकूण हजार ४१३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात हजार ४८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात हजार ६२ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १५ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात लाख ७९ हजार ६७८ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९१.८५ टक्के, नाशिक शहरात ९६.६८ टक्के, मालेगाव मध्ये ८८.९२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ इतके आहे