एअर इंडियाच्या ४५ लाख प्रवाशांचा डेटा लीक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एअर इंडियाच्या ४५ लाख प्रवाशांचा डेटा लीक

नवी दिल्ली, : एअर इंडियाच्या तब्बल ४५ लाख प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. यात
भारतासह अन्य देशांच्या प्रवाशांचाही समावेश आहे, असे एअर इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एका
निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.

तब्बल १० वर्षांचा डेटा लीक
निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांची वैयक्तिक माहिती स्टोअरिंग आणि प्रोसेसिंग SITA PSS सर्व्हरवर हा
सायबर हल्ला झाला असून २६ ऑगस्ट, २०११ ते २० फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील डेटा चोरीला गेला आहे. या
सायबर हल्ल्यामध्ये प्रवाशांची नावे, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पासपोर्ट डिटेल्स यासह क्रेडिट कार्डसंदर्भातील
तपशीलही लीक झाला आहे. 
क्रेडिट कार्डचे पासवर्ड बदलण्याचे आवाहन
एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्डची माहिती लीक झाली असली तरी सीवीवी/सीवीसी नंबर
डेटा प्रोसेसचा भाग नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. खबरदारीसाठी ग्राहकांनी
आपापल्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलावा, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे.
अशा मिळाल्या यंत्रणेला सूचना
२५ फेब्रुवारीला एअर इंडियाला डेटा उल्लंघनासंदर्भात प्रोसेसरकडून पहिली सूचना मिळाली होती. २५ मार्च आणि ५
एप्रिलला प्रभावित डेटासंदर्भात माहिती मिळाली. १९ मार्च रोजी एअर इंडियाने एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून
डेटा लीक झाल्याची माहिती दिली होती. डेटा सुरक्षितेतेच्या दृष्टीने या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
डेटा सुरक्षिततेच्या संदर्भात एक्सटर्नल स्पेशलिस्ट कार्यरत असून एअर इंडियाच्या एफएफपी प्रोग्रामचा पासवर्ड
देखील बदलण्याचे काम सुरू आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. एअर इंडियासह मलेशिया एअरलाइन्स,
फिनएयर, सिंगापूर एअरलाइन्स, लुफ्थांसा आणि कॅथे पॅसिफिक या कंपन्यांवरही सायबर हल्ला झाला आहे.