प्रीमियर लीगचा फुटबॉलपटूंना सोडण्यास नकार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रीमियर लीगचा फुटबॉलपटूंना सोडण्यास नकार

फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपापल्या देशाकडून खेळण्यासाठी इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघांनी खेळाडूंना मनाई केली आहे. त्यामुळे ‘फिफा’ आणि प्रीमियर लीगच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या या प्रकरणावरून वादविवाद सुरू आहेत.

पुढील वर्षी कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक रंगणार असून त्यासाठीच्या पात्रता स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत आहेत. मात्र लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, चेल्सी यांसारख्या प्रमुख क्लब्सनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना यासाठी रजा देण्यात येणार नाही, अशी भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संघांच्या चिंतेत भर पडली आहे.

लिव्हरपूलचा अ‍ॅलिसन, चेल्सीचा थियागो सिल्व्हा आणि मँचेस्टर सिटीचा गॅब्रिएल जिजस हे तिघे ब्राझीलचे खेळाडू असल्याने माजी विजेत्या ब्राझीलला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. याशिवाय लिव्हरपूलचा मोहम्मद सलाहसुद्धा इजिप्तच्या पात्रता लढतींना मुकण्याची शक्यता बळावली आहे.