जुलै-ऑगस्ट मध्ये कोव्हॅक्सीन लसीचे उत्पादन 6 कोटींपर्यंत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जुलै-ऑगस्ट मध्ये कोव्हॅक्सीन लसीचे उत्पादन 6 कोटींपर्यंत

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  देशात सुरु असलेल्या कोरोना  लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि अन्य माध्यमांवर होणार  अपप्रचार आणि गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लसीकरणाबाबतच्या अपप्रचाराला उत्तर ही विशेष मोहीम सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून  या संदर्भात योग्य  उत्तर आणि स्पष्टीकरण देत केंद्र सरकारने नमूद केले आहे कीकेंद्र सरकार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 16 जानेवारीपासून लसींचा पुरवठा करत आहे. लसींचे वितरण आणि उपलब्धता सुयोग्य व्हावीयासाठी केंद्र सरकार सातत्याने लस उत्पादकांच्या संपर्कात आहे. तसेच एक मे पासून राज्यांनाही लस खरेदीचे अन्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

भारत बायोटेक कंपनीच्या काही लसींच्या मात्रांची नोंद नसल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिध्द केले आहे. मात्रहे वृत्त निराधार असूनत्यात पूर्ण माहितीचा अभाव आहे.भारत-बायोटेक च्या सहा कोटी मात्रा असल्याचा काही प्रसारमाध्यमांनी केलेला दावा,म्हणजे समजुतीतील चूक असल्याचे दिसते आहे.

भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सीन चे सध्या असलेली उत्पादन क्षमता मे आणि जून महिन्यातदुपटीने वाढवण्यात येणार आहे आणि नंतर म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात ती सहा-सात पटींनी वाढवण्यात येणार आहे. म्हणजेचसध्या म्हणजेच एप्रिलमध्ये असलेली एक कोटींची लस उत्पादन क्षमता जुलै-ऑगस्ट महिन्यात 6 ते 7 कोटींपर्यंत वाढू शकेल. आणि सप्टेंबर महिन्यात ही क्षमता महिना/ दहा कोटी मात्रांपर्यंत वाढेल.

आत्मनिर्भर भारत 3.0 च्या मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत कोव्हॅक्सीनची  उत्पादन क्षमता वाढवली जाणार आहे. जैव तंत्रज्ञान विभागाद्वारे हे अभियान राबवले जात आहे.लस वैद्यकीय महत्वाचेजैव-उत्पादन असल्याने ते विकसित होण्यास आणि त्याची गुणवत्ता सिद्ध होण्यास वेळ लागतो. यात सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्यानेउत्पादन एका रात्रीत होऊ शकत नाही. त्यामुळेचउत्पादन क्षमता वाढवण्याची प्रक्रियाही वेळखाऊ असते. शुक्रवार पर्यंत भारत बायोटेकने आतापर्यंत केंद्र सरकारला 2,76,66,860 लसींच्या मात्रांचा पुरवठा केला आहे. यापैकी2,20,89,880 मात्रा, ( वाय गेलेल्या मात्रांसह) राज्ये/केंद्रशासित प्रदेशात लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. म्हणजेचअद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोव्हेक्सीनच्या एकूण 55,76,980 शिल्लक आहेत.  खाजगी रुग्णालयांनाही याच महिन्यात लसींच्या 13,65,760 मात्रा मिळाल्या आहेत. मे महिन्यातकोव्हेक्सीनच्या अतिरिक्त 21,54,440 मात्रा पुरवल्या जाणार आहेत. यामुळे एकूण अपेक्षित पुरवठा 3,11,87,060 इतका आहे. जून महिन्यापर्यंत सुमारे 90,00,000 मात्र देण्याची कटिबद्धता उत्पादकानी व्यक्त केली आहे.