राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

बालिका वधू या मालिकेमधील दादीसा या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या मागील अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात भूमिका साकारल्या आहेत. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना 'बधाई हो' या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१८ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

त्यांचे गाजलेले चित्रपट :

किस्सा कुर्सी का’ (१९७८)

तमस (१९८८)

मम्मो (१९९५)

बधाई हो (२०१८)